मन पावसाळी वारे स्पर्श ओलसर माती
मग सावल्या सुखाच्या अन घट्ट बिलगून येती
ही रात ओठातली दरवळते चांदणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
मन पावसाळी वारे स्पर्श ओलसर माती
मग सावल्या सुखाच्या अन घट्ट बिलगून येती
ही रात ओठातली दरवळते चांदणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
या सावळ्या नशेची हवा गार ओघळते
लय आज देहाची अलवार विरघळते
या सावळ्या नशेची हवा गार ओघळते
लय आज देहाची अलवार विरघळते
तू सोडवून जाशी तरी माझे गुंतणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
या पावसाला जरा मग आर्जवे करावी
आपली तहान वेडी अर्धी-अर्धी व्हावी
या पावसाला जरा मग आर्जवे करावी
आपली तहान वेडी अर्धी-अर्धी व्हावी
मन उतू जाते आता असे त्याचे सांडणे
आहे आतुरले हळवे हे एक मागणे
हां हां हां हां हां हां हां हां